Tanker Mafia | घोडबंदरला पाणी असूनही टँकर माफियांचा सुळसुळाट, MNS चा आरोप

Continues below advertisement
ठाण्याच्या घोडबंदर परिसरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) तीव्र भूमिका घेतली आहे. MNS चे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. घोडबंदर रोडवरील उच्चभ्रू सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने अविनाश जाधव यांनी रहिवाशांसह आयुक्तांची भेट घेतली. टँकर माफिया पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचा आरोप MNS कडून करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वर्षानुवर्षे एकच अधिकारी कार्यरत असल्याने बांधकाम व्यावसायिक आणि टँकर माफिया यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही MNS ने केला. बैठकीत असे निदर्शनास आणून देण्यात आले की, घोडबंदरला ११४ एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना ११० एमएलडी पाणी उपलब्ध आहे. केवळ ४ एमएलडी पाण्याची कमतरता असूनही, घोडबंदरमधील रहिवासी दरमहा लाखो रुपयांचे पाणी टँकरद्वारे विकत घेतात. याचा अर्थ पाणी चोरी होत असून, ते बांधकाम व्यावसायिकांना पुरवले जात आहे किंवा टँकर माफियांकडून त्याची लूट केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola