Zero Hour : राकेश किशोरला कृत्याचा खेद नाही, देशभरात संताप

Continues below advertisement
या घटनेवरती देशभरामध्ये सध्या संताप आहे. पण असं असताना आरोपी राकेश किशोर याला मात्र आपल्या कृत्याचा ना खेद वाटतोय ना खंत. 'मी अहिंसेचा पुरस्कर्ता आहे' असं सांगत किशोर यांचं म्हणणंय की, सरन्यायाधीशांच्या ऍक्शनवरती ही रिएक्शन होती. 'मी अहिंसेच्या खूप विरोधात आहे, पण एक अहिंसक, साधा माणूस ज्याच्यावर आजपर्यंत कोणताही गुन्हा नाही, तो कोणत्याही ग्रुपचा सदस्य नाही, त्याला हे सर्व का करावं लागलं, याचा विचार करायला हवा' असंही त्यांनी नमूद केलं. 'मी कमी शिकलेला नाही, मी MSc, PhD, LLB, गोल्ड मेडलिस्ट आहे. मी नशेत नव्हतो किंवा गोळ्या खाल्ल्या नव्हत्या' असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना कोणताही खेद नाही, 'ना मला या गोष्टीचा अफसोस आहे की काय झालं, काय नाही झालं' असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola