Thane Polls : ठाण्यात इच्छुकांच्या शिबिराच 70 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार

Continues below advertisement
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. भाजपच्या बैठकीत आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar), निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत 'अब की बार सत्तर पार, महापौर BJP चाच' असा निर्धार करण्यात आला. 'स्वबळावर लढायचं, निर्णय स्थानिक पातळीवरच घ्या' असा आदेश Devendra Fadnavis यांनी दिल्याचंही बैठकीत सांगण्यात आलं. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी भाजपनेही संघटन मजबूत केल्याने दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच वाढली आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे ६७, तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले होते. यंदा दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, स्थानिक कार्यकर्त्यांचा विश्वास आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय यावर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola