Thane Politics: 'आम्ही कायम तयारीत', BJP आमदार Sanjay Kelkar यांचा ठाण्यात एकला चलो रे चा नारा
Continues below advertisement
ठाण्यातील राजकारण तापले असून भाजपचे आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर शिवसेनेने (Shiv Sena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कामाचा दाखला देत प्रत्युत्तर दिले आहे. ‘तीन शे पासष्ठ दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे,’ असं म्हणत भाजप आमदार संजय केळकरांनी आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या तयारीचे संकेत दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे योगेश करमाणी यांनी सांगितले की, ठाण्याचा महापौर कोण हे जनताच ठरवेल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकासासाठी दिवस-रात्र एक केले आहेत. त्यांनी असेही सुचवले की, मित्रपक्षांनी आपली मते जाहीरपणे मांडण्याऐवजी वरिष्ठ नेत्यांकडे मांडावीत, जेणेकरून वादविवाद टाळता येतील. ठाणे ही शिवसेनेची महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement