Stray Dog Menace: पुणे शहरात अडीच लाख भटक्या कुत्र्यांना Microchip, PMC चा राज्यात पहिलाच प्रकल्प
Continues below advertisement
पुणे (Pune) शहरातील भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. 'राज्यातला हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प' असून, या अंतर्गत भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप (Microchip) बसवली जाणार असल्याची माहिती आहे. पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे अडीच लाखांवर पोहोचली असून, नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मायक्रोचिपमुळे कुत्र्यांचा माग ठेवणे, त्यांच्या लसीकरणाची आणि नसबंदीची माहिती मिळवणे सोपे होणार आहे. शहरात प्राण्यांच्या जन्म नियंत्रणासाठी (Animal Birth Control) आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम यापूर्वीपासूनच सुरू आहे, त्याला आता या नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement