Thane Kopri Bridge Demolition : ठाण्यात रस्त्यांचा मेगाब्लॉक, कोपरी पुलाच्या कामामुळे वाहतुक बंद
ठाण्यातील कोपरी पुलाच्या रुंदीकरणासाठी सात गर्डर टाकण्यात येणार आहेत. यासाठी आज आणि उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. यावेळी कोपरी पुलावरील दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद असणार आहे.. ठाणे मुंबई नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.