Kharegaon Flyover : मंत्री एकनाथ शिंदेंना कोरोना, खारेगाव उड्डाणपुलाचं उद्घाटन रखडलं
Thane : पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामात अडथळा ठरत असलेल्या खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अजूनही मुहूर्त सापडत नाहीये या पुलाचे उद्घाटन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल असे शिवसेनेकडून जाहीर केले असताना पालक मंत्री एकनाथ शिंदे कोरोना बाधित झाल्याने ते रखडले. तब्बल 189 कोटी रुपये खर्चून तयार केलेला हा उड्डाणपूल पूर्ण होऊन आता राजकारण्यांच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने जयंत पाटील यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करणार सांगितले होते. मात्र ते देखील अजून करण्यात आले नाही.