कोरोनामुळे सण साध्या पद्धतीने साजरे करण्याची वेळ, काहींचं यातही राजकारण सुरू : Ajit Pawar
Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या भाषणात व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. मात्र आज त्यांच्याच कार्यक्रमात एका दारुड्यानं एन्ट्री केली आणि अजितदादांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत, लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत असं म्हणत तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाईच्या सुचनाही त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी कोरोनामुळे सण साध्या पद्धतीने साजरे करण्याची वेळ आलीय तर काही जण कोरोना काळातही राजकारण करतायत असं वक्तव्य केलं आहे.