Thane Diva स्थानकांमध्ये 350 लोकल आणि शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द
उपनगरीय लोकलनं प्रवास करत असलेल्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्ही जर शनिवार, रविवार किंवा सोमवारी मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकलनं प्रवास करणार असाल तर तूर्तास तुमचा बेत बदला. याचं कारण ५, ६ आणि ७ फेब्रुवारी या तीन दिवसांत ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळं ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान जवळपास ३५० लोकल धावणार नाहीत. या तीन दिवसांत मध्य रेल्वेच्या जलद लोकल ट्रेन्स स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत.