Thane : ठाण्यात बेकायदेशीर इमारतींवर तोडक कारवाई, स्थानिक आक्रमक, पोलिसांशी झटापट
Continues below advertisement
ठाणे (Thane) महानगरपालिका हद्दीतील दिवा (Diva) प्रभाग समितीमधील बेकायदेशीर इमारतींवर (Illegal Buildings) मोठी कारवाई सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानंतर पालिकेने हा कारवाईचा बडगा उगारला आहे. 'या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून, त्यांनी बेकायदेशीर इमारतींमध्ये शिरण्यासाठी पोलिसांना मज्जाव केला आहे,' असे चित्र दिसत आहे. कारवाईसाठी १० ते १५ जेसीबी (JCB) तैनात करण्यात आले असून, एकूण आठ अनधिकृत इमारती पाडण्यात येणार आहेत. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, मात्र नागरिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement