Thane Civic Showdown: आयुक्त सौरभ राव यांनी सचिन बोरसेंना हटवले

Continues below advertisement
ठाणे महापालिकेतील (Thane Municipal Corporation) वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसे (Sachin Borse) यांच्या बदलीवरून महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) आक्रमक झाल्याचे चित्र आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी, 'दरोडेखोरांना पकडायला जसा अख्खा गाव एकत्र येतो, तसे आम्ही एकत्र आलो' असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. या आंदोलनानंतर पालिका आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी कारवाई करत सचिन बोरसे यांची बदली केली आहे. त्यांच्याकडून निवडणूक विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला असून, तो आता कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ठाण्यातील भ्रष्टाचार, पाणीचोरी आणि इतर समस्यांविरोधात शिवसेना, मनसे आणि महाविकास आघाडीने एकत्र येत महापालिकेवर मोर्चा काढला होता. यानंतर आयुक्तांनी हे पाऊल उचलले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola