City 60 Superfast News : 17 OCT 2025 : सिटी सिक्स्टी बातम्या : Maharashtra News : ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील दोन प्रमुख घडामोडींनी वातावरण तापले आहे. एकीकडे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या ₹31,000 कोटींच्या पॅकेजच्या फसवणुकीच्या आरोपावरून राज्यभर 'काळी दिवाळी' आंदोलनाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे बीडमध्ये ओबीसी समाजाचा 'महाएल्गार' मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 'निवडणुकीत सरकारला ओबीसींच्या रोषाला सामोरं जावं लागेल', असा थेट इशारा लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील हैदराबाद गझेटियरचा (Hyderabad Gazetteer) जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते एकवटले आहेत. आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी पराकाष्ठा करू, असे आश्वासन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहे. तर, भाजप नेते केशव उपाध्ये यांनी पवार यांच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे सांगत त्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement