Thane BJP : ठाण्यात निवडणुकीपूर्वीच बेबनाव? स्वबळावर लढावं, स्थानिक भाजप नेत्यांची मागणी
ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक भाजप नेत्यांनी वरिष्ठांकडे युती नको अशी मागणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेत भाजप मजबूत स्थितीत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे महायुतीत न जाता स्वबळावर लढण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे. वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यात भाजप खूप मजबूत आहे. पक्षाला एकांगी मते मिळाली आहेत आणि लोकांचा ओढा भाजपच्या दिशेने आहे. स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना सांगितले की, "जर आपण महायुतीमध्ये लढलो तर आपल्या स्थानिक जे कॅडर आहे त्याला खूप मोठा फटका बसेल. त्याच बरोबर जे पदाधिकारी आहेत ते नाराज देखील होण्याची शक्यता आहे आणि यातून पक्षफुटीत देखील शक्यता आहे." अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी अनेक वर्षांपासून महानगरपालिकेसाठी तयारी करत आहेत. महायुतीत लढल्यास स्थानिक कार्यकर्त्यांचे नुकसान होईल आणि पदाधिकारी नाराज होऊन पक्षफुटीची शक्यता आहे. या संदर्भात अनेक बैठका झाल्या असून, राज्यपातळीवरील नेत्यांनी स्थानिक आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडून माहिती घेतली आहे. स्वबळावर लढण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे.