Sadabhau Khot | गोरक्षकांना इशारा देताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. दोन ट्रकमधून नेण्यात येणारा तब्बल ६९२ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी सांगोल्यात गोरक्षकांविरोधात मोर्चा काढला. 'गोरक्षक हे रक्षक नसून भक्षक आहेत,' असा आरोप त्यांनी केला. 'तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या ठोळ्याला नांगराचा फाळ गंतविशिवाय राहणार नाही,' असा इशारा खोत यांनी दिला. यंदा गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना राज्य सरकारने टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-बंगळूरू आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर ही टोलमाफी लागू होईल. खराब रस्त्यांवर टोल वसुली करता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. यानुसार पुणे ते कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव या राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली करता येणार नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे अॅप आधारित टॅक्सी संस्थांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे निर्देश दिले असून १४७ टॅक्सी सेवांवर कारवाई करण्यात आली आहे. नांदेडच्या सिरपल्ली गावात अडकलेल्या गर्भवती महिलेला महसूल विभागाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.