Thane : ठाण्यामधील शहापूरमध्ये Bird flu संसर्ग,पोल्ट्री फार्मवर अचानक तीनशे कोंबड्यांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळतंय. वेहलोली गावातील एका पोल्ट्री फार्मवर अचानक तीनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलीय. या पोल्ट्री फार्मच्या १ किमीच्या परिघात असलेल्या सर्व कोंबड्या मारुन टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. इतर पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू पसरु नये यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. बर्ड फ्लूनं कोंबड्याचा मृत्यू झाला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलंय.