Thackeray vs Shinde in SC :राज्यपालांनी मर्यादेत राहावं, सरकार पाडण्यात मदत करु नये :CJI Chandrachud

Continues below advertisement

सत्तासंघर्षावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे.. देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या युक्तिवादानं आजच्या सुनावणीची सुरुवात झाली. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांची बाजू मेहता यांनी मांडली. त्यावर टिप्पणी करताना सरन्यायाधीशांनी महत्त्वाची टिप्पणी केली. तीन वर्ष एकत्र सत्तेत होते, मात्र तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत मोडला का, असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. तसंच, बंड फक्त एकाच पक्षात झालं होतं.. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ९७ आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं.. राज्यपालांकडून याचा विचार झाला नसल्याचं दिसतं, असंही ते म्हणाले.  शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्ष नेता म्हणून निवड केली होती, म्हणूनच राज्यपालांनी त्यांना निमंत्रण दिलं असं उत्तर मेहता यांनी दिलं.. सध्या न्यायालयाची सुनावणी लंच ब्रेक साठी थांबलेली आहे लंचब्रेकनंतर ही सुनावणी पुन्हा सुरू होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram