Thackeray vs Shinde Election Commission : निर्णायक लढाई? शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार?
Continues below advertisement
शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची? मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला देणार याची उत्तरं आज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय देतं याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळं संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी आणि प्रतिनिधी सभा बोलावण्यासाठी परवानगी देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Aditya Thackeray Election Commission Uddhav Thackeray Shiv Sena 'Eknath Shinde Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shiv Sena Symbol Row : Uddhav Thackeray Shiv Sena Symbol Row LIVE Thackeray Vs Shinde LIVE Shinde Vs Thackeray Supreme Court