Thackeray vs Koshyari : ही कोणती भाषा? मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल खवळले ABP Majha

Continues below advertisement

 महाविकास  आघाडी सरकार आणि राज्यपालांमधील संघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्या पत्राला उत्तर दिले आहे. या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रातील भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला होता. हा प्रस्तावाला मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram