CM To Rajyapal : ठाकरेंनी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी मागे ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिलाय... ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकानं मागे घेतलेय.. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ही यादी मागे घेत असल्याचं पत्र दिलंय. १२ नोव्हेंबर २०२० मध्ये ठाकरे सरकारनं १२ नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती... मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही होते.. मात्र दरम्यानच्या काळात सरकार बदलल्यानंतर आता ही यादीच मागे घेण्याचं पत्र शिंदे सरकारनं दिलंय.
Tags :
Governor Bhagat Singh Koshyari Letter MLA Shock Chief Minister Thackeray List Eknath Shinde Governor Appointed