Thackeray Reunion | ठाकरे बंधू देणार मोठी बातमी? दसरा मेळाव्याकडे लक्ष
गेल्या दोन महिन्यात ठाकरे बंधू तीनवेळा एकत्र आले आहेत. मराठी विजय मेळावा, वाढदिवस आणि गणपतीच्या निमित्ताने त्यांच्या भेटी झाल्या. पुढच्या महिन्यात एक घडामोड घडण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी दसरा मेळाव्यात काहीतरी घडामोड होईल असे संकेत दिले. एबीपी माझाच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. अहिर म्हणाले, "दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र येतील का नाही हे माहिती नाही पण आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही." त्यांनी पुढे सांगितले की, यावेळचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा भूतोन भविष्यती स्वरुपाचा असेल. पक्षाचे आणि आघाडीचे व्यासपीठ वेगळे असले तरी, राज्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे अशी लोकांच्या मनात भावना आहे. गणपतीनंतर पितृपक्ष सुरू होत असून, दसऱ्याला निश्चितपणे एक बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे. आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाण्याबाबतही चर्चा झाली.