Lalbaugcha Raja Visarjan Delay | 27 तास उलटले, High Tide मुळे राजाच्या विसर्जनाला अडथळा!
Continues below advertisement
लालबागच्या राजाच्या विसर्जनाला तब्बल सत्तावीस तास उलटूनही अद्याप पूर्ण यश आलेले नाही. गिरगाव चौपाटीवर राजाची मूर्ती गेल्या अनेक तासांपासून अर्धी पाण्यात आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे मूर्तीला तराफ्यावर चढवताना अडचणी येत आहेत. जोपर्यंत भरतीचे पाणी कमी होत नाही आणि ओहोटी लागत नाही, तोपर्यंत विसर्जन करणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. पाणी आणि तराफा यांच्यातील समतोल राखणे कठीण जात असल्याने विसर्जनाचा कालावधी लांबला आहे. स्कुबा डायव्हिंगचे एक्सपर्ट्स आणि कार्यकर्ते विसर्जनासाठी प्रयत्न करत आहेत. भाविकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली आहे. मुंबईचा राजा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही मदतीसाठी हात पुढे केला. दुपारी दोन वाजता ओहोटीची वेळ होती आणि त्यानंतर पाण्याची पातळी कमी होण्याची अपेक्षा आहे. अडीच ते तीनच्या दरम्यान पाण्याची पातळी योग्य होईल आणि त्यानंतर विसर्जनाची पुढील प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement