Raj Uddhav Thackeray : 'चुकीची रिक्षा पकडून Nagpur ला गेलेल्यांनी परत या' बॅनरने लक्ष वेधले
उद्याच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर Worli Dome परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांचे तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे एकत्रित फोटो लावण्यात आले आहेत. तब्बल अठरा वर्षांनंतर Thackeray बंधू एकत्र येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. एका बॅनरवर 'जे मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून Nagpur ला गेले आहेत, त्यांनी परत Mumbai त Thackeray बंधूंकडे या नाहीतर कायमचे Gujarat ला पोहचाल' असा मजकूर पाहायला मिळतोय. तसेच, 'सभा झाल्यावर आदेश द्या महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचं आहे' असा मजकूरही आणखी एका फलकावर लिहिण्यात आला आहे. 'आवाज मराठीचा आपल्या मराठी जनांचे हार्दिक स्वागत' आणि 'मराठी एकजुटीचा विजय असो' असेही बॅनर लावण्यात आले आहेत. 'महाराष्ट्रात मराठी आणि मराठीसाठी ठाकरेच' असा आशय असलेले बॅनरही लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे, या बॅनरवर कोणत्याही पक्षाचं चिन्ह किंवा पक्षाचं नाव नाहीये, फक्त Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांचे फोटो आणि वेगवेगळे आशय असलेले बॅनर पाहायला मिळतात. यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आता उद्याच्या मेळाव्यामुळे अधिक बळ मिळणार आहे.