TOP 70 : सकाळी 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 04 July 2024 : ABP Majha

वरळी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंच्या शिवसेना आणि मनसेची एकत्र तयारी सुरू आहे. मनसे नेते आणि ठाकरे बंधूंच्या शिवसेनेचे नेते मेळावा स्थळीस जाऊन आढावा घेणार आहेत. पाच तारखेच्या मेळाव्यासाठी किती लोक जाणार आणि काय नियोजन असेल या संदर्भात बैठक झाली. विजयी मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याचं ठाकरे बंधूंचं आवाहन आहे. वरळी डोमच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आले आहेत. राज ठाकरेंकडून केलेल्या आवाहनाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून हरताळ फासण्यात आला. कोणत्याही पक्षाचा बॅनर किंवा झेंडा आणण्यात किंवा लावण्यात येऊ नये असं मनसेनं आवाहन केलं होतं. ज्यांनी बॅनर लावला त्यांना ठाकरेंची शिवसेना समज देईल असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कुठलाही श्रेय वाद नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिला असंही त्यांनी वक्तव्य केलं. या विजयी मेळाव्यात शरद पवार सहभागी होणार नाहीत. नियोजित कार्यक्रमामुळे जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवारांऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आदित्य ठाकरे, अमित ठाकरे देखील मेळाव्यात उपस्थित राहतील. राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीवर विधानपरिषदेत विस्तृत चर्चा झाली. राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या तस्करीचं मोठं आव्हान आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ड्रग माफिया नवीन चिचकारने ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली. या तस्करीत पोस्टाचे कर्मचारी आणि पोलिसांचाही सहभाग होता. शेवटच्या स्टेजचा कॅन्सल झालेल्या महिलांचाही तस्करीसाठी वापर केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. हायड्रो गांजा तस्करीतील पोलिसांचं निलंबन आणि बडतर्फी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पहिले थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होईल. मंचावर बसण्यास मज्जाव करण्यात आल्यानं मस्तानीच्या वंशजांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी ग्राहकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मारहाण करणाऱ्या दुकानदाराला माजी खासदार राजन विचारेंनी कार्यालयात बोलावून माफी मागायला लावली. ठाण्यातील मारहाण हा वाद अमराठी मराठी असा नाही, खासगी कारणावरुन वाद आणि मारहाण झाली अशी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आहे. दिशा सालियंन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं. हा विषय राजकीय आरोपांचा नसून दिशा सालियंच्या वडिलांचा आहे, सोळा तारखेच्या सुनावणीत काय होतं ते बघू असं नितेश राणेंनी म्हटलं. पंढरपूरमधील वीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालन केलं. शिंदेंनी मुखदर्शन घेतल्यानं सामान्य भाविकांची दर्शन रांग सुरूच राहिली. आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये भाजपचे नेते प्रीतम म्हात्रेंचा कुटुंबियांसोबत सहभाग होता. सोलापूरच्या उगडेवाडीमध्ये माउलींच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यादरम्यान शोपदाराकडून महिलेला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. भारताविरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने द्विशतक ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये शुभमनचं हे पहिलंच द्विशतक आहे. गिलच्या खेळीनं भारतीय संघानं धावांचा डोंगर रचला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola