Thackeray Group Delhi High Court:केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गट दिल्ली हायकोर्टात :ABP Majha

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्हं गोठवल्यानंतर ठाकरे गटानं आता दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय. चिन्हं गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटानं याचिकेत केलीय. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप ठाकरे गटानं याचिकेत केलाय. ठाकरे गटाने दिलेल्या तीनही पर्यायी चिन्हांना संरक्षण मिळावे असा उल्लेख याचिकेत करण्यात आलाय. तसंच आपल्या विचारसरणीशी निगडीत चिन्ह फ्री सिम्बॉल यादीत नसल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय.. मात्र चिन्ह निवडण्याचा अधिकार असून त्यानुसारच पर्याय दिल्याचे ठाकरे गटाने याचिकेत म्हटलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola