Thackeray Brothers Reunion: 'युती जवळपास निश्चित', शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंच्या ऐक्याची जोरदार चर्चा

Continues below advertisement
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संभाव्य युतीची चर्चा जोर धरू लागली आहे, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात या घडामोडींचे पडसाद उमटत आहेत. रांगोळीतून ठाकरे कुटुंबातल्या ऐक्याचा आणि मराठी अस्मितेच्या भावनेचा संदेश देण्यात आला आहे. ठाण्यातील 'भव्य रांगोळी प्रदर्शन २०२५' मध्ये कलाकार उमेश सुतार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव आणि राज ठाकरे यांचे व्यक्तिचित्र साकारले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सरचिटणीस संदीप पाचंगे आणि कलाछंद रांगोळीकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, ज्यामुळे ठाण्यात राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकीकरणाची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola