Raj - Uddhav Thackeray : 'महाराष्ट्राचं स्वप्न साकार', ठाण्यामध्ये Uddhav आणि Raj Thackeray यांच्या युतीचे बॅनर

Continues below advertisement
ठाण्यात (Thane) मनसेच्या (MNS) वतीने लावण्यात आलेल्या एका बॅनरने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू केली आहे. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे फोटो असून त्यावर 'महाराष्ट्राचं स्वप्न साकार' असा मजकूर लिहिण्यात आला आहे, ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. अलीकडच्या काळात दोन्ही भावांमध्ये वाढलेली जवळीक आणि अनेक भेटीगाठींमुळे त्यांच्यातील राजकीय मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. विशेषतः आगामी मुंबई, ठाणे आणि इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर महत्त्वाचे मानले जात आहेत. या बॅनरमुळे मनसे आणि शिवसेना (UBT) कार्यकर्ते उत्साहित झाले असले तरी, युतीची अधिकृत घोषणा मात्र अद्याप बाकी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola