Thackeray Reunion : 'राजकारण विसरून मनोमिलन', 3 महिन्यांत सहावी भेट
Continues below advertisement
ठाकरे बंधू राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील जवळीक पुन्हा एकदा दिसून आली असून, त्यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. 'ही भेट केवळ कौटुंबिक असून महापालिका निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नाही,' असं राज ठाकरे यांनी 'मातोश्री'बाहेर स्पष्ट केलं. गेल्या तीन महिन्यांतील ही सहावी भेट असून, राज ठाकरे हे सहकुटुंब स्नेहभोजनासाठी 'मातोश्री' निवासस्थानी दाखल झाले. आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे जरी या भेटींना कौटुंबिक स्वरूप दिलं जात असलं तरी, राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना दरवर्षी होणाऱ्या दीपोत्सवाचे आमंत्रण देण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement