Raj Uddhav Thackeray at Satyacha Morcha : राज ठाकरे - उद्धव ठाकरेंचा एकत्र मोर्चात सहभाग
Continues below advertisement
मुंबईत (Mumbai) मतदार यादीतील (Voter List) घोळाच्या मुद्द्यावरून आज ठाकरे बंधू (Thackeray Brothers) रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वात हा 'सत्याचा मोर्चा' (Satyacha Morcha) आयोजित करण्यात आला आहे. ‘मतदार याद्यांमध्ये नेमका घोटाळा कसा झाला?’, असा थेट सवाल करत आज एक नोव्हेंबरला हे विराट शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. मेट्रो सिनेमाजवळून (Metro Cinema) निघालेला हा मोर्चा मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक मोठे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने या मोर्चाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, प्रशासनावर दबाव वाढवण्याचा हा एक मोठा प्रयत्न मानला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement