Chandrashekhar Bawankule on Satyacha Morcha : 'हा मोर्चा पराभवाची कारणं देण्यासाठी'

Continues below advertisement
मतदार यादीतील (Voter List) घोळाविरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) काढलेल्या 'सत्याचा मोर्चा'वर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार टीका केली आहे. 'निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कारणे देण्यासाठी हा मोर्चा आहे', असा थेट हल्ला बावनकुळे यांनी चढवला. तुम्ही जिंकता तेव्हा मतदार यादी चांगली असते आणि हरल्यावर बोगस, असे ते म्हणाले. लोकसभेत याच मतदार यादी आणि EVM वर ३१ खासदार निवडून आले होते, मग तेव्हा मतचोरी झाली होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसून अनेक मोठे नेते मोर्चापासून अलिप्त आहेत, हे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांचे लक्षण असल्याचे बावनकुळे म्हणाले. हा मोर्चा म्हणजे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि लोकसभा निवडणुकीतील 'फेक नॅरेटिव्ह'ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola