Thackeray brothers alliance | Raj Thackeray-Uddhav Thackeray युती चर्चा; MVA मध्ये खळबळ, काँग्रेस सावध

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दक्ष झाले आहेत. मनसे आणि शिवसेना युती झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिकृतपणे भूमिका जाहीर करतील. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सोबत घेण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने "दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शवलाय." असे म्हटले आहे. तर काँग्रेसनं मात्र सावध पवित्रा घेतला आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसकडून कळविण्यात आले आहे. काँग्रेसला राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतांवर परिणाम होण्याची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांच्या रणनीतीनुसार, जिथे मराठी मतदारांची संख्या जास्त आहे आणि मनसे-शिवसेनेची ताकद आहे, तिथे मनसेसोबत युती होईल. तर जिथे महाविकास आघाडीतील घटक पक्षांची ताकद आहे, तिथे महाविकास आघाडी एकत्र लढेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola