Solapur Heavy Rain | सोलापुरात ढगफुटी सदृश पाऊस, नागरिकांच्या घरात पाणी

सोलापूर शहरात चोवीस तासात 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी मानले जाते, त्यामुळे सोलापूरमध्ये तांत्रिकदृष्ट्या अतिवृष्टी झाली. शेळगे, मित्रनगर आणि 256 गाळा परिसरात पाणी साचले. नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, बुद्रुक, चुंगी, वाघदरी या ग्रामीण भागांनाही पावसाचा मोठा फटका बसला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे ओढे-नाले आधीच भरून वाहत होते, त्यात या पावसाची भर पडल्याने पाणी ओव्हरफ्लो झाले. वाघदरी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने वाघदरी आणि हिरोळी भागातील शेती पाण्याखाली गेली. वाघदरी परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला. अनेक नागरिकांची घरे वाहून गेली, शेतीचे नुकसान झाले. एका शाळेचे वीस वर्षांहून अधिक जुने रेकॉर्ड पाण्यात गेले. 256 गाळा परिसरात ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरले. एका नागरिकाने सांगितले, "आमच्या घरात पाणी आलय. आमचं सगळं नुकसान झालंय. धान्य, अन्नधान्य सगळं आमचं कपडे ते नुकसान झालंय. लयीत पाणी आलंय. सगळ्या एजांमध्ये खाण्याच्या इजामध्ये नुकसान झालंय बघा आमचं." प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola