TET EXAM :5 एप्रिलपर्यंत शिक्षक भरती चाचणीचे वेळापत्रक सादर करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश : ABP Majha
टीईटी आणि टीएआयटीची चाचणी परीक्षांचं वेळापत्रक ५ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्रतिवादींना देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमुर्ती आर. एम. जोशी यांनी हे आदेश दिले आहेत. शिक्षक भरतीतील पात्र उमेदवार गणेश शेटे यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली. तसंच या याचिकेनुसार २०१७ पासून ते २०२२ पर्यंत अभियोग्यता चाचणी झालीच नसल्याचं बोललं जातंय..