TET Exam Scam : टीईटी पेपरफुटी प्रकरणात लखनऊमधून सौरभ त्रिपाठी नावच्या व्यक्तीला अटक : ABP Majha

टी ई टी पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलीसांनी लखनऊमधून एकाला अटक केली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटकेत असलेल्या या व्यक्तीचं नाव आहे. सौरभ त्रिपाठी विनर नावाची कंपनी चालवातो. त्याच्या या कंपनीने 2017 साली शिक्षण परिषदेचे परिक्षा घेण्याचे कंत्राट जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीला मिळवुन देण्यासाठी मध्यस्थाचं काम केले होते.   2017 ते 2020 पर्यंत हे कंत्राट जी ए टेक्नॉलॉजीकडे होते.  मात्र त्यानंतर मागील वर्षी हे कंत्राट सौरभ त्रिपाठीच्याच विनर कंपनीला देण्यात आलय. सध्या पुणे पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola