TET Exam : शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 2 वर्षांनंतर शिक्षक पात्रता परिक्षेचं आयोजन
Continues below advertisement
अखेर 2 वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय. 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. शिक्षण क्षेत्रात भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना ही संधी उपलब्ध होणार आहे. इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. दरवर्षी सात लाख जण ही परीक्षा देतात. गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यंदा अंदाजे दहा लाख जण या परीक्षेला बसण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Varsha Gaikwad ABP Majha TET Exam ABP Majha Video TET Exam 2021