Tesla India Launch | Tesla भारतात दाखल, कारची संपूर्ण वैशिष्ट्ये एका व्हिडिओत

Continues below advertisement
टेस्ला Model Y भारतात दाखल झाली आहे. बीकेसीमध्ये टेस्लाचे Experience Center उघडण्यात आले आहे. या आकर्षक लाल रंगाच्या मॉडेलमध्ये LED लाईट्स, चारही बाजूंना CCTV कॅमेरे आणि थ्री डिग्री व्ह्यूची सुविधा आहे. गाडीत LED लायटिंग, Steering Wheel वर टेस्लाची Branding आणि मोठी Screen आहे. एका Charge मध्ये ही गाडी ६२२ किलोमीटरचा पल्ला गाठते आणि शून्य ते शंभर किलोमीटर प्रतितास वेग ५.६ सेकंदात गाठते. २०२३-२४ मधील जगातली Top Selling गाडी असल्याचा टेस्लाचा दावा आहे. ही SUV असून यात Rear View Camera आहे. सध्याचे मॉडेल चीनच्या Shanghai मध्ये बनवले आहे, मात्र भारतात निर्मितीचा सरकारचा प्रयत्न आहे. Top Model ची किंमत जवळपास ६७ लाख रुपये आहे. टेस्लाच्या भारतातील पहिल्या Showroom वर मराठी पाटी ठळकपणे लावण्यात आली आहे. हा मुंबईकरांशी नाते सांगण्याचा प्रयत्न आणि मराठी भाषेचा बहुमान आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंची Shiv Sena आणि राज ठाकरेंची MNS यांच्यात युती होणार का, यावर दोन ठाकरेंकडून वेगवेगळी उत्तरं मिळत आहेत. सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत, "राज आता सोबत आहे" असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola