SpaceX Dragon Splashdown | शुभांशू आणि अंतराळवीरांचे पृथ्वीवर यशस्वी 'कमबॅक'
Continues below advertisement
शुभांशू आणि इतर अंतराळवीरांचे पृथ्वीवर यशस्वी आगमन झाले आहे. त्यांची 'ड्रॅगन' अवकाशकुपी समुद्रात उतरल्यानंतर लहान बोटींच्या साहाय्याने मुख्य जहाजापर्यंत आणण्यात आली. या अवकाशकुपीतून अंतराळवीरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही 'ड्रॅगन' अवकाशकुपी, ज्याला 'ग्रेस' असेही म्हटले जाते, ती पहिल्यांदाच वापरण्यात आली आहे. या अवकाशकुपीच्या बाहेरील भागावर उष्णता रोखणारे कवच आहे, जे वातावरणात प्रवेश करताना होणाऱ्या घर्षणापासून संरक्षण करते. आतमध्ये तीन ते चार अंतराळवीरांच्या बसण्याची सोय असून, नियंत्रण पॅनेल, टॉयलेट आणि खाण्यापिण्याच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पृथ्वीवर परत येताना अंतराळवीरांना मानसिक आधार देण्यासाठी नियंत्रण कक्षाशी त्यांचा संपर्क कायम असतो. सुमारे साडेबावीस तासांचा प्रवास करून ही अवकाशकुपी अचूक ठिकाणी उतरली. अंतराळवीरांना लगेच बाहेर न काढता, त्यांच्या शरीराला गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ दिला जातो. शुभांशु ठकला यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ते साधारण पंधरा दिवसांनी भारतात परत येतील. शुभांशु ठकला आणि प्रशांत नायर यांनी दहा महिने प्रशिक्षण घेतले होते. पुढील अर्ध्या ते एक तासात त्यांना किनाऱ्यावर नेऊन पुनर्वसन केंद्रात दाखल केले जाईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement