Twitter : टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांना ट्विटरमध्ये १०० टक्के मालकी हक्क मिळणार?

Continues below advertisement

टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांना ट्विटरमध्ये १०० टक्के मालकी हक्क विकत घ्यायचे आहेत. यासाठी त्यांनी एका शेअरमागे ५४.२० डॉलर मोजण्याची तयारी दर्शविली आहे. याचाच अर्थ ट्विटरसाठी ते ३.२ लाख कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहेत. गेल्याच आठवड्यात एलन मस्क हे ट्विटरच्या बोर्डावर येणार असल्याची बातमी आली होती. एलन मस्क यांनी ट्विटरशी निगडीत काही पोस्ट आणि मतांचे कौल घेण्य़ासही सुरुवात केली होती. यात ट्विट एडिट करण्याचा पोलही होता. मात्र नंतर ट्विटरच्या सीईओंनी एलन मस्क ट्विटरच्या संचालक बोर्डावर येणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर मस्क यांनी नवा डाव खेळला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram