Ranbir Alia Wedding : रणबीर कपूर - आलिया भट्ट लग्नबेडीत, वास्तू निवास्थानी लग्नसोहळा ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAlia Ranbir Wedding : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठी (Alia Bhatt) आजचा दिवस खास आहे. आज दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं आहे. वास्तू बंगल्यात दोघांनी सात फेरे घेतले आहेत. लग्नानंतर आलिया-रणबीरचे फोटो समोर आले आहेत. आलिया-रणबीर जोडी लग्नानंतर 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जातात.गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण अखेर आज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. रणबीर आलियाच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.