Girish Mahajan : एसटी नर्मदा नदीत कोसळल्याने भीषण अपघात, गिरीश महाजन घटनास्थळी जाणार

Continues below advertisement

Girish Mahajan : मध्य प्रदेशातल्या इंदूरहून जळगावातल्या अमळनेरकडे येणारी एसटी धारमध्ये नर्मदा नदीत कोसळली... या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झालाय.. ज्यापैकी ८ मृतदेहांची ओळख पटली आहे. ज्यात चार जण जळगावचे, एक जण मूर्तीजापूरचे तर दोन जण राजस्थानचे असल्याची माहिती मिळतेय.. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातातील १५ जणांना वाचवण्यात यश आलं असलं तरी अनेक जण बेपत्ता आहेत.. बसमध्ये ५० ते ५५ प्रवासी होते अशी माहिती मिळतेय. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासोबत भाजपनेते गिरीश महाजन घटनास्थळी जाणार आहेत. तर, मध्य प्रदेश सरकार दोन्ही राज्यांच्या समन्वयासाठी एका मंत्र्याची नियुक्ती करणार आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram