Temple Reopen | उघडले देवाचे द्वार... राज्यातील मंदिरांसह धार्मिकस्थळे खुली

तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरं आणि प्रार्थनास्थळं आजपासून खुली झाली आहे. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. बहुतांश मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला, भाविकांना दिवाळाचं भेट दिली. राज्यातील सर्व मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे. कोरोनाव्हायरस आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील मंदिरं मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola