Pune Crime news : कोथरुड पोलिसांवर शिवीगाळ केल्याचा आरोप, रात्रभर मुलींकडून ठिय्या आंदोलन

Continues below advertisement
पुण्यातील कोथरूड येथे पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या मुली अखेर रात्री साडेतीन वाजता घरी परतल्या. मात्र, मुलींच्या मागणीनुसार पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पीडित मुलींसह आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर आणि शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतरही गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मुलींनी पोलिसांवर टॉर्चर आणि मोलेस्टेशन केल्याचा आरोप केला आहे. त्या दलित समाजातल्या असल्याने त्यांच्यावर अट्रॉसिटी केली जात असल्याचा आणि जातिवाचक शिव्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. "त्या दलित समाजातल्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातिवाचक शिव्या देतात आणि आता एसपी-- सीपी ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेन पण नाही घेतात," अशी वस्तुस्थिती समोर आली आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी असे काहीही झाले नसल्याचे आणि पोलिसांविरोधात पुरावे नसल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. रात्री साडेतीन वाजेपर्यंत न्याय मिळवण्यासाठी मुली आणि कार्यकर्ते झगडत होते, मात्र अखेर त्यांना माघार घ्यावी लागली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola