Team India in Delhi : Virat Kohli, Suryakumar Yadav ची दिल्ली विमानतळावर पहिली झलक | T20 World Cup
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्वेन्टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी विशेष विमानाने दाखल झाली. भारतीय संघाने 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे रंगलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदाला भरते आले आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यापासून भारतात कधी दाखल होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर भारतीय संघाचे गुरुवारी सकाळी सात वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झाले.
दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला. दिल्ली विमानतळावरुन टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना रोहित शर्मा याने चाहत्यांच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावून दाखवला. याशिवाय, चाहत्यांच्या गराड्यातून दिल्ली विमानतळावरुन बाहेर पडताना रोहित शर्मा याने पुन्हा एकदा वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली. वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला.