Teachers Constituency Election Special Report : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाबद्दलचा मविआतील तिढा सुटला
Teachers Constituency Election Special Report : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाबद्दलचा मविआतील तिढा सुटला
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: मुंबई : लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election 2024) राज्यात आता विधानपरिषद निवडणुकांचे (Vidhan Parishad Election) वारे वाहू लागले आहेत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) युती आणि आघाडी धर्म न पाहता उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई शिक्षक (Mumbai News), मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये येत्या 26 जूनला निवडणुका होणार आहेत. दरम्यान, मनसेकडून (MNS) कोकण पदवीधर निवडणुकीसाठी (Konkan Graduate Election) अभिजीत पानसेंना उमेदवारी घोषित केली होती. पण, भाजपच्या मनधरणीनंतर मनसेकडून उमेदवारी मागे घेण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर चार विधान परिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील जवळपास प्रत्येक पक्षानं आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये युती आणि आघाडी धर्म पाळला गेलेला नाही. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.