Teacher Shortage: ‘शिक्षक द्या नाहीतर तीव्र आंदोलन’, Washim मधील संतप्त पालकांचा थेट इशारा
Continues below advertisement
वाशिमच्या (Washim) मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसार जिल्हा परिषद शाळेत अपुऱ्या शिक्षकांमुळे (Teacher Shortage) विद्यार्थी आणि पालकांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठले. शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनातच मुलांची शाळा भरवत अनोखे आंदोलन करण्यात आले. ‘जर शिक्षक देण्याची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करू’, असा थेट इशारा यावेळी संतप्त पालकांनी दिला. मंगळसार येथील जिल्हा परिषद शाळेत ४५ विद्यार्थी असून, नियमानुसार दोन शिक्षक कार्यरत असायला हवेत. मात्र, एकच शिक्षक असल्याने आणि तेही व्यवस्थित शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यावर प्रभारी गटशिक्षक श्रीकांत म्हैसेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, एक शिक्षक आजारपणामुळे रजेवर होते, मात्र ते आता रुजू झाल्याने शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement