Mirzapur Train Tragedy: रेल्वे रुळावर मृत्यूचं तांडव, चुकीच्या दिशेनं उतरल्यानं 4 प्रवाशांचा अंत

Continues below advertisement
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर (Mirzapur) येथील चुनार रेल्वे स्टेशनवर (Chunar Railway Station) एक भीषण अपघात झाला असून, यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चोपान-प्रयागराज एक्सप्रेसमधून (Chopan-Prayagraj Express) उतरलेले प्रवासी प्लॅटफॉर्मच्या बाजूने न उतरता विरुद्ध दिशेला रुळांवर उतरले. त्याचवेळी समोरून आलेल्या हावडा-कालका नेताजी एक्सप्रेसच्या (Howrah-Kalka Netaji Express) धडकेत या चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व प्रवासी कार्तिक पौर्णिमेनिमित्त (Kartik Purnima) गंगेत स्नान करण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, बचावकार्य वेगाने करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola