Thane TDRF TAUKTAE Cyclone : ठाणे पालिकेचं TDRF पथकही तैनात, 33 जवान करणार चक्रीवादळाचा सामना

सिंधुदुर्ग/रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर आदळलं. चक्रीवादळाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहे. चक्रीवादळामुळे समुद्रातील लाटांनी रौद्र रुप धारण केल्याचे पहायला मिळाले. 80 ते 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात अनेक घरांवरील छप्परं उडाली. अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्यात. रस्त्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या भागातील वीज खंडीत झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola