Maharashtra Unlock : ...तर पुन्हा एकदा राज्यात निर्बंध लावावे लागतील: Task Force Chief Dr Sanjay Oak

Continues below advertisement

Maharashtra Corona Update : राज्यात एकीकडे निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे.  राज्यामध्ये जर ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले तर तेव्हा निर्बंध लावावे लागणं हे अपरिहार्य असेल, अशी माहिती राज्याचे कोविड टास्क कोर्स प्रमुख डॉ संजय ओक यांनी दिली आहे. 

डॉ संजय ओक म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे आणि त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता विसरून चालणार नाही. यामध्ये आर्थिक चक्राला गती देण्यासाठी, सर्वसामान्यांचं जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी समतोल आणि समन्वय मध्य साधण्याची गरज होती.  म्हणून टास्क फोर्सने अनेक बैठका घेऊन शासनाला निर्बंध कसे शिथिल करता येतील यबाबत सूचना केल्या होत्या.  त्यानुसार दुकाने, मॉल्स, जिम खुली करण्यात आली आहेत मात्र हे निर्बंध शिथिल करत असताना शासनाने समाजाकडून काही अपेक्षा ठेवल्या आहेत. मास्क सोशल डिस्टंसिंग, जिथे-जिथे वर फ्रॉम शक्य आहे या प्रणालीचा वापर करणं, कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवणे, क्यू आर कोड आयडी कार्ड असलेल्या व्यक्तींना लोकलमध्ये प्रवेश देणे या सर्व बाबींचा अंतर्भाव आहे, असं त्यांनी सांगितलं. 

त्यामुळे एकीकडे निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे. राज्यामध्ये जर ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजन ची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले तर तेव्हा निर्बंध लावावे लागणं हे अपरिहार्य असेल, असं ओक यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram