Tanushree Dutta | तनुश्री दत्ताचे नवे आरोप, घरातच 'त्रास', नाना पाटेकरांवर निशाणा Special Report
Continues below advertisement
तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून कुटुंबावरच गंभीर आरोप केले आहेत. आपण आपल्या घरातच सुरक्षित नसल्याचे तिने म्हटले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून आपल्याला त्रास दिला जात असल्याचे तिचे म्हणणे आहे. या त्रासामुळे तिची तब्येत बिघडली असून ती कोणतेही काम करू शकत नाहीये. तिने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास सांगितले. तनुश्री दत्ताने या छळामागे ज्येष्ठ अभिनेते Nana Patekar आणि Bollywood मधील Mafia Gang असल्याचा आरोप केला आहे. Nana Patekar हे गुंड पाठवत असून ते अभिनेते नसते तर गँगस्टर असते, असेही तिने म्हटले आहे. 2018 साली Casting Couch झाल्याचा आरोप तिने केला होता. आता पुन्हा तिने गंभीर आरोप केले आहेत. तिला Sushant Singh Rajput सारखाच त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप तिने केला आहे. "फरक बस इतना है कि वो चल बसे हैं और मैं जिंदा हूं," असे तिने म्हटले आहे. ABP Majha ने Nana Patekar यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement