Lokmanya Tilak National Award | केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना जाहीर, CM-DCM उपस्थित राहणार

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी एक ऑगस्टला टिळक स्मारक मंदिरात होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर टिळक यांनी सांगितले की, "शुक्रवारी एक ऑगस्टला टिळक स्मारक मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचं वितरण होईल." हा पुरस्कार लोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो आणि देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करतो. नितीन गडकरी हे या पुरस्काराचे यंदाचे मानकरी ठरले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola