Tamasha : तमाशा कलावंतांची परवड; परवानगी नसल्याने कलाकारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न
गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ तमाशा क्षेत्रात हुकूमत गाजवणारा , महाराष्ट्र ला वेड लावणारा आणि दिल्लीचे तख्तचीही वाहवा मिळवनारा सांगलीतील कवलापूरचा काळू-बाळूचा तमाशा सध्या अडचणीत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून फड बंद असल्याने अधिकच अडचण या तमाशा कलाकाराची झाली होती. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झला असल्याने गावा गावातील यात्रा पुन्हा गजबजणार असे दिसतेय. त्यामुळे या यात्रात तमाशाच्या सुपाऱ्या देखील जास्त मिळण्याची आशा आहे. मात्र या तमाशात पुन्हा जीव आणण्याची, तमाशा पुन्हा सुरू करण्याची आर्थिक ताकद देखील या मंडळींकडे सध्या नाही.